२६ जानेवारीला हल्ल्याचा कट उधळला•आली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले पाचही जण काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मद या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा काश्मीरमधील दोन ग्रेनेड हल्ल्यात सहभाग असल्याचंही समोर आलं आहे. तपास यंत्रणांकडून या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे. आणखी दहशतवादी कारवायांची माहिती या दहशतवाद्यांकडे काश्मीर ___ असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नुकतंच काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातूनही भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. दहशतवाद्यांसोबतच कुलगाममध्ये जम्मू काश्मीर पोलीसचे डीएसपी आखला देविंदर सिंह यांनाही अधिकाऱ्यांनी अटक केली. देविंदर सिंह यांच्यावर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. : प्रजासत्ताक दिनाला म्हणजे २६ जानेवारीला दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या ५ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील हजरतबल भागातून या दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. प्राणघातक हल्ल्याचा एक मोठा कट उधाळून लावत जम्मू काश्मीर ___ पोलिसांनी या पाच दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी २६ जानेवारीला श्रीनगरच्या आसपास आत्मघातकी किंवा आयईडी हल्ल्याचा कट आखला होता. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्र आढळून
२६ जानेवारीला हल्ल्याचा कट उधळला; 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांना अटक